राहुल पाराजी आरोटे
blog

युवक सक्षमीकरण

"तरुणाईसाठी प्रेरणादायी नेत्रत्व!" युवकांसाठी विविध रोजगार संधी आणि विकास प्रकल्प राबवले गेले आहेत:

  • तरुणांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना
  • सरकारी योजनांबाबत जागरूकता शिबिरे
  • करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावे
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
  • रोजगार मेळावे व स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप्स
  • तरुण नेतृत्व घडवण्यासाठी पक्षात सक्रिय सहभाग व भूमिकांची संधी
  • खेळाडूंना प्रोत्साहन देणारे उपक्रम व मैदानांची सुविधा

राहुल पाराजी आरोटे हे तरुणांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत. त्यांनी तरुणांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण केंद्रांच्या स्थापनेचा संकल्प केला आहे, जेथे आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी प्रेरणा देणारे मार्गदर्शन कार्यक्रम ते नियमितपणे राबवत आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करून त्यांनी अनेक तरुणांना यशाचा मार्ग दाखवला आहे. विविध रोजगार मेळावे, स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप्स यांच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना राजकीय नेतृत्वासाठी प्रशिक्षित करून जबाबदारीच्या भूमिका दिल्याआहेत. याशिवाय, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाचे साहित्य, मैदानांची सुविधा आणि स्पर्धांचे आयोजनकरून त्यांनी युवा उर्जा योग्य दिशेने वळवली आहे. राहुल आरोटेंचा विश्वास आहे की सक्षम व सजग तरुणच देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.

"युवा पिढी ही राष्ट्राची उर्जाशक्ती आहे. त्यांच्यात कल्पकता, जिद्द आणि परिवर्तन घडवण्याची ताकद आहे. योग्य दिशा दिल्यास हेच युवक आपल्या देशाच्या प्रगतीचे शिल्पकार ठरू शकतात!"

- राहुल पाराजी आरोटे